पश्चिम बंगाल : रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या एका कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचा जीव वाचवल्याचं दिसत आहे. भारतीय रेल्वेने एच. सतीश कुमार यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यासारखे धाडसी आणि मेहनती कर्मचारी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीवर, पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील बालीचक रेल्वे स्थानकावरील 24-सेकंदाच्या CCTV फुटेजमध्ये, रेल्वे कर्मचारी एच. सतीश कुमार येणार्या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून सिग्नल करताना दिसत आहेत. मात्र, कुमार यांनी प्लॅटफॉर्मवरून मागे वळण्यापूर्वी रुळांवर बघितले, तेव्हा त्यांना रुळांवर कोणीतरी पडलेले दिसले. त्यानंतर, कुमार यांनी थोडाही विलंब न करता लगेच त्या माणसाकडे धाव घेतली आणि रुळांवर उडी मारली. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला उचलले आणि रुळांमधील रिकाम्या जागेत घेऊन गेले. त्यानंतर काही क्षणांनंतर एक ट्रेन त्यांच्या जवळून गेली.
सेवा, सुरक्षा और सहयोग
A precious life was saved by the courageous act of help by on-duty staff, who jumped on tracks himself to save a person from getting gravely injured.
Indian Railways is proud to have daring & diligent staff like H. Satish Kumar and commends his bravery. pic.twitter.com/gcnHCrtXg4— Ministry of Railways (@RailMinIndia) June 23, 2022
कुमार यांनी काही सेकंद उशीर केला असता तर त्यांनी वाचवलेल्या माणसाला ट्रेनची धडक बसली असती. त्या व्यक्तीने रुळावरून उडी मारली की चुकून पडली हे स्पष्ट झालेले नाही.
रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ शेअर करताना ट्विट केले की, “सेवा, सुरक्षा आणि सहयोग… एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ऑन-ड्युटी कर्मचार्यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे एक अनमोल जीव वाचला. एच. सतीश कुमार यांच्यासारखे धाडसी आणि मेहनती कर्मचारी असल्याचा भारतीय रेल्वेला अभिमान आहे आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक करतो.”




