Father who complained of molesting his daughter was shot dead

भयंकर : मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार नोंदवणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या…

देश

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील नौझरपूर गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वडिलांनी नोंदवली. त्यामुळे आरोपींनी सोमवारी संध्याकाळी पीडितेच्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये हाथरसच्या सासनी भागामध्ये गावातल्या गौरव शर्मा या तरुणाने पीडितेचा विनयभंग केला होता. या प्रकाराविरोधात पीडितेचे वडिल अमरीश शर्मा (वय 52) यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली. मात्र, महिन्याभरातच आरोपी जामिनावर बाहेर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो तक्रार मागे घेण्यासाठी अमरीश यांच्यावर दबाव टाकत होता.

सोमवारी संध्याकाळी पीडितेच्या वडील अमरीश आपल्या शेतात काम करत होते. तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगी त्यांच्यासाठी शेतात जेवायला डबा घेऊन आल्या होत्या. त्यावेळी गौरव आपल्या तीन मित्रांसह तेथे आला आणि तक्रार मागे घेण्यासाठी धमकी द्यायला सुरुवात केली. पीडितेच्या वडिलांनी काही बोलण्याअगोदरच त्यांच्यावर बेछूट गोळीबार करून आरोपी तेथून निघून गेले. अमरीश यांना तात्काळ हाथरस येथे उपचारासाठी नेण्यात आले, परंतु, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पीडितेला मोठा धक्का बसला आहे.

अमरीश शर्मा यांच्या मुलीने याप्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटूंबाने सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय अमरीश यांचा अंत्यसंस्कार न करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, पोलिसांनी समजावल्यानंतर कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यासाठी सहमत झाले. यावेळी वडिलांच्या पार्थिवाला मुलीनेही खांदा दिला. हे पाहून तेथील उपस्थितांचे डोळे पाणावले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत