मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातील भाजप खासदार नंदकुमारसिंग चौहान यांचं निधन झालं आहे. मागील महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, नंतर प्रकृती खालावल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यावर नंदकुमारसिंग चौहान यांना दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज (मंगळवार) त्यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक नेत्यांनी नंदकुमारसिंग चौहान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.