Boy Dies While Trying To Fly Like Superman
देश

दुर्दैवी! सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नोएडा : एका 12 वर्षीय मुलाचा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी “सुपरमॅन स्टंट” करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी त्याच्या चार लहान बहिणी त्याच्यासोबत होत्या, त्यापैकी एकजण मोबाईल कॅमेरात हे सर्व रेकॉर्ड करत होती. सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी सुरजीत नावाच्या 12 वर्षीय मुलाने कॉमिक बुक हिरोची नक्कल करण्यासाठी गळ्यात कापड बांधले. सुरजीत गळ्यात केप घालून सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने लाकडी पेटीतून उडी मारली, यावेळी पेटीच्या एका काठावर कापड अडकल्याने त्याला गळफास बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेच्या वेळी तो त्याच्या 11, 9, 7 आणि 5 वर्षांच्या चार बहिणींसोबत होता. त्याची 11 वर्षांची बहीण त्याच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत होती.

ही भयंकर घटना घडली तेव्हा या मुलाच्या बहिणींनी तात्काळ त्यांच्या आईला याबाबत सांगितले. त्यानंतर सुरजीतला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नंतर सेक्टर 30 मधील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, या चिमुकल्याला वाचवता आले नाही.  अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की त्याला सुपरमॅन व्हिडिओ पाहण्याची आवड होती आणि तो अनेकदा या कॉमिक बुकमधील नायकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत