Supreme Court dismisses Cyrus Mistry's review plea
देश

टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सायरस मिस्त्री यांची याचिका

नवी दिल्ली : टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरणात सायरस मिस्त्री यांची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. टाटा सन्सच्या प्रमुखपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणारी एसपी समूहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

NCLAT ने आपल्या डिसेंबर 2019 च्या निकालात, टाटा सन्सच्या 24 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचे मानले होते. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्च २०२१ च्या निकालात नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) चा हा आदेश बाजूला ठेवला होता.

एसपी ग्रुप आणि सायरस मिस्त्री यांनी एप्रिल 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि टाटा सनच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या निर्णयाला मान्यता देणार्‍या 26 मार्चच्या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली होती. टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष मिस्त्री यांची ऑक्टोबर २०१६ मध्ये पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. रतन टाटा यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. एन चंद्रशेखरन यांनी नंतर टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश एसए बोबडे आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने निकाल देताना म्हटले होते की, मिस्त्री यांची केवळ कार्यकारी अध्यक्षपदावरूनच नव्हे तर संचालकपदावरूनही हकालपट्टी योग्य आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत