Tiger attack in Tadoba Andhari Tiger Reserve buffer zone, Chandrapur
महाराष्ट्र

चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर मध्य प्रदेशातील सारी परिसरातील रहिवासी प्रेमसिंग उदे (वय ५५) यांचा कंपार्टमेंट क्रमांक ३५७ मध्ये वाघाने हल्ला करून जीव घेतला.

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्राथमिक आर्थिक मदत देण्यात आली आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वाघांच्या वाढलेल्या हालचाली लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव बफर झोनमधील बांबू तोडण्याचे काम तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. तसेच, त्या भागातील इतर कामगार आणि जवळच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, वाघांच्या हालचालींवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत