बीड महाराष्ट्र

बीडमध्ये शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याची झडप, शालमुळे वाचला जीव

बीड : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात बुधवारी दुपारी एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. कोळवाडी गावातील ४५ वर्षीय मनकर्णा शिवराम नेटके यांच्यावर शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना रूपपूर शिवर परिसरात घडली. सकाळच्या सुमारास जवळच्या डोंगराळ भागातून बिबट्याची डरकाळी ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, शेतात काम करणाऱ्या मजुरांनी याकडे विशेष […]

Tiger attack in Tadoba Andhari Tiger Reserve buffer zone, Chandrapur
महाराष्ट्र

चंद्रपूरच्या ताडोबा बफर झोनमध्ये वाघाच्या हल्ल्यात दोन कामगारांचा मृत्यू

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन बांबू तोडणाऱ्या मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील शैसावी गावाचे रहिवासी बुधसिंग श्यामलाल मडावी (वय ४१) यांचा चंद्रपूर वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३८१ मध्ये वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. […]

Nagpur Infant Death | Suspected Animal Attack in Narsala Hudkeshwar Area
नागपूर महाराष्ट्र

हृदयद्रावक! अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीतून ८ महिन्यांच्या चिमुकलीला उचललं, छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

नागपूर : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसाळा गावाच्या मागील भागात मंगळवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. स्मशानभूमीजवळील नाल्याच्या पलीकडे असलेल्या मजूर वस्तीमध्ये अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या ८ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थलांतरित मजूर कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. मृत चिमुकलीचे नाव अनुष्का रवी मेळा […]

महाराष्ट्र सातारा

मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : मानवी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. हा वावर कमी करण्यासाठी वन विभागाने व वन्यजीव विभागाने उपाययोजना कराव्यात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता नागरिकांनी तात्काळ वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर यावर करावयाच्या उपायोजनांसदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापूर्वीच्या (दि. २० जानेवारी २०२५) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय […]

Leopard Attack in Ahilyanagar: Leopard Drags Away 5-Year-Old Girl in Front of Mother
अहिल्यानगर महाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये हृदयद्रावक घटना! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेलं

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नरभक्षक बिबट्यांकडून वारंवार हल्ले होत असतानाच आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात बुधवारी (१२ नोव्हेंबर) […]

Man-eater Leopard Shot Dead
पुणे महाराष्ट्र

पुणे : ‘नरभक्षक’ बिबट्याला अखेर शार्पशूटर्सनी गोळ्या घालून संपवले

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन जणांचा जीव घेणाऱ्या “नरभक्षक” बिबट्याला अखेर वन विभागाच्या शार्पशूटर्सनी ठार केले. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजता झालेल्या या कारवाईत बिबट्याला गोळी घालण्यात आली. वन विभागाच्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड परिसरात या बिबट्याने दोन अल्पवयीन मुले आणि एका वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर, शिरूर, […]

Ganesh Naik Vasai Virar Bird Park
महाराष्ट्र मुंबई

वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीत, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. मंत्री नाईक यांनी मंत्रालयात वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील विविध कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. वसई विरार महापालिकेच्या मंजूर विकास […]

नागपूर महाराष्ट्र

रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना वेळेत पूर्ण करा – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर : विदर्भातील पर्यटन आणि तिर्थक्षेत्रात रामटेकचे अनन्य साधारण महत्व असून याठिकाणी स्थानिकांना रोजगार निर्मितीची विविध संसाधणे उपलब्ध होण्यासाठी रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा आपण तयार केला आहे. या आराखड्यामध्ये रोपवेची सुविधा, सर्व सुविधायुक्त यात्री निवास, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणारी गडमंदिर परिसरात नियोजनबद्ध दुकानांची गाळे, भव्य पार्कीग सुविधा आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. याला […]

The recruitment process of forest department should be implemented immediately – Sudhir Mungantiwar
महाराष्ट्र

वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्य शासनाने अमृत महोत्सवी वर्षात सुरू केलेल्या पदभरती अभियानात वन विभाग अव्वल राहावा याकरिता वनविभागाची पदभरती प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या वन विभागाच्या बैठकीत मंत्री मुनगंटीवार यांनी वन विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. […]