पुणे : सासवड रस्त्यावरील दिवे घाटात टँकर उलटून दुचाकीला धडकल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात चौघे जण जखमी झाले. कच्च्या अल्कोहोलची वाहतूक करणारा टँकर दिवे घाटात उलटला. यावेळी टँकरने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर पलटल्यानंतर त्यात दोघे जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेेत केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. अपघातात चौघे जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Maharashtra | Casualties feared after a tanker carrying raw alcohol fell into a gorge in Dive Ghat in Pune last night. pic.twitter.com/ez9WdHib69
— ANI (@ANI) May 8, 2023




