Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar
महाराष्ट्र मुंबई

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते. विश्वनाथ महाडेश्वर यांना मंगळवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी दोन वाजता पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. विश्वनाथ महाडेश्वर २००२ मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करण्यात आली.

विश्वनाथ महाडेश्वर यांची राजकीय कारकीर्द

  1. 2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
  2. 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
  3. 2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
  4. 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले
  5. 2017 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड…

महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती.  अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसताना अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच देखील नाव चर्चेत होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत