MIG-21 crashes in Rajasthan, three women killed, pilot safe

राजस्थानमध्ये MIG-21 एका घरावर कोसळले, तीन जणांचा मृत्यू, पायलट सुरक्षित

देश

राजस्थान : राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सोमवारी सकाळी मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळलं आहे. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळलं. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या विमानाचा वैमानिक सुखरूप बचावला. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिगने सुरतगड येथून उड्डाण केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळण्यापूर्वी पायलट पॅराशूटच्या मदतीने सुरक्षित बचावला. विमान घरावर पडल्याने आजूबाजूचे लोक मात्र कचाट्यात सापडले. या अपघातात आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बन्सो, बंटो आणि लीलादेवी अशी मृत महिलांची नावे आहेत. हनुमानगड सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी एसएचओ लखबीर सिंग यांनी तिघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात अन्य तिघे जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या सुरतगड स्थानकावरून मिग-२१ या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, टेक ऑफ केल्यानंतर लगेचच या विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. पायलटने याबाबत स्टेशनला माहिती दिली. यानंतर पायलट पॅराशूट विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, हनुमानगढ येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील एका घरावर हे विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच हवाई दलाने बचावकार्य सुरू केले असून हेलिकॉप्टरमधून बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत