The missing Pune businessman Gautam Pashankar finally found

बेपत्ता झालेले पुण्यातील व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले

पुणे

पुण्यातील पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर सापडले आहेत. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गौतम पाषणाकर जयपूर येथे सापडले आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून युनिट १ या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर असल्याची माहित युनिट १ क्राइम ब्रांचला मिळाली. सध्या त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. ते लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि तो घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं होतं. गौतम पाषाणकर यांचं शेवटचं लोकेशन शहरातच दाखवत होतं. याशिवाय एटीएममधून पाच हजार रुपये काढल्याचंही समोर आलं होतं. तसंच त्यांनी फोन फॉरमॅट करत सर्व माहिती डिलीट केली होती. पोलिसांनी गौतम पाषाणकर यांचा एक फोटो प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये ते शेवटचे दिसले होते. शिवाजीनगर पोलिसांनी जर कोणी त्यांना पाहिलं असल्यास किंवा इतर काही माहिती असेल तर आपल्याकडे येण्याचं आवाहन केलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत