The missing Pune businessman Gautam Pashankar finally found
पुणे

बेपत्ता झालेले पुण्यातील व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले

पुण्यातील पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर सापडले आहेत. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. गौतम पाषणाकर जयपूर […]