selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 46 मोबाईल केले हस्तगत

पुणे : पोलिसांनी बसमधील तसेच बस स्टॉपवरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 46 मोबाईल हस्तगत करुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

16 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ओंकार योगेश राठोड, रा. कात्रज, पुणे हे पुणे स्टेशन वरुन कुटुंबासह ससून हॉस्पिटलजवळील आंबेडकर पुतळा येथील बस स्टॉप येथे पायी येत असताना त्यांच्यामागुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने ओंकार राठोड यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारुन घेतला, तर दुसऱ्या व्यक्तीने त्यांना जोराचा धक्का दिला. त्यानंतर दोघेही साधु वासवानी चौकाच्या दिशेने पळुन गेले. त्यानंतर ओंकार यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे जाऊन 2 अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल केला.

ससुन हॉस्पीटल परिसरातुन तसेच पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून या पुर्वी अनेक मोबाईल तसेच दुचाकी वाहने चोरी गेल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. त्या गुन्हयांचा तपास, पोलीस उप निरीक्षक राहुल पवार व तपास पथकाचे अंमलदार करीत आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या आरोपींच्या वर्णनावरुन तसेच सदर भागातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज तपासले असता गुन्हयातील संशयीत आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. संशयीत आरोपींचे फुटेज स्थानिक पानटपरी चालक, हातगाडीवाले व बातमीदार यांना दाखवून आरोपींबाबत माहिती देण्यात आली.

16 एप्रिल रोजी रात्रौ 11.30 वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की आरोपी हॉटेल सम्राट गल्ली, पुणे स्टेशन या ठिकाणी आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन आरोपींना शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे सदाम कासीम शेख (वय 23, रा. सोमजी गाव, बालाजी किराणा दुकानाजवळ, कोंढवा, पुणे) आणि अनिल ऊर्फ आन्या अरुण बोबडे (वय 27, रा. लाल देवळा जवळ, कँप, पुणे) अशी आहेत. त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पुणे शहरात विविध ठिकाणी चोरलेले तसेच बसमधील प्रवाशांचे एकूण १० लाख रुपये किंमतीचे 46 मोबाईल हस्तगत करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत