मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी द्रौपदी मुर्मू या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून या भेटीत त्या शिवसेना आणि भाजप खासदार आणि आमदारांची लीला हॉटेलमध्ये भेट घेणार आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. #DraupadiMurmu @Dev_Fadnavis pic.twitter.com/8HPWDTjsGe
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 14, 2022
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यापल देखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या राज्यपाल बनल्या आहेत. याआधी BJP-BJD युती सरकारमध्ये २००२ ते २००४ पर्यंत त्या मंत्री देखील होत्या.




