Homeless man dies after suv runs over him in Pune

पुणे : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले, धक्कादायक घटना कॅमेरात कैद…

पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला एसयूव्हीने चिरडले. या प्रकरणातील सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे त्या व्यक्तीला गाडीच्या दोन्ही चाकांनी चिरडल्यानंतर आरोपी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला.

ही घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. या प्रकरणाचा तपास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे यांनी सांगितले की, आम्हाला कारच्या नंबर आणि मॉडेलवरून कारच्या मालकाची माहिती मिळाली असून तो लवकरच आमच्या ताब्यात येईल. सध्या, अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 279, 304 (ए) (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134, 187 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत किंवा कोणी हरवल्याची तक्रार दाखल झालेली नाही. समोर आलेला व्हिडिओ हा एका किराणा दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आहे. व्हिडिओमध्ये तो माणूस रस्त्याच्या कडेला झोपलेला दिसतो. त्याच्या शेजारी एक कुत्रा बसला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो माणूस दारूच्या नशेत होता. यामध्ये तिथे आधीच उभी असलेली एक एसयूव्ही नंतर पुढे जाते आणि त्यानंतर चालक गाडीचा वेग वाढवत त्या व्यक्तीवर गाडी चढवतो.

२० हून अधिक कॅमेऱ्यांचा शोध घेतल्यानंतर आरोपीची ओळख पटली
पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे यांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर आरोपींनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला. वाहनाचे चाक मृताच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर, आम्ही जवळपास 20 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे शोधले आणि कारचा नंबर आणि मॉडेल मिळवले.

पोलिसांना पोस्टमॉर्टम अहवाल मिळाला, ज्यात या व्यक्तीचा मृत्यू अनेक फ्रॅक्चर आणि जखमांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही व्यक्ती सुमारे 70 वर्षांची होती. ही व्यक्ती भीक मागायची आणि परिसरातील फूटपाथ आणि इतर ठिकाणी झोपायची. एसयूव्ही ड्रायव्हरविरुद्ध रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करत मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसयूव्ही चालकाने जोरदार ‘यू-टर्न’ घेतल्यामुळे हा अपघात झाला, अशी माहिती मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत