मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी माहीम व दादर येथे सुरु होणाऱ्या मनसेच्या नवीन उपक्रमाविषयी माहिती दिली. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ अशा नावाचा एक अनुकरणीय उपक्रम मनसे तर्फे सुरु करण्यात येत आहे. मनसे रिपोर्टने अधिकृतरीत्या ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे कि, मनसेच्या माहीम व दादर येथील कार्यालयात फ्रिज ठेवला जाईल. नागरिकांनी या फ्रिजमध्ये त्यांच्या घरातील अतिरिक्त अन्न, फळे, बिस्कीट अशा कोणत्याही खाण्यायोग्य वस्तू आणून ठेवाव्यात व गरजूंनी त्या घेऊन जाव्यात, अशी यामागे संकल्पना आहे.
माणुसकीचा फ्रीज..@1nitinsardesai @SandeepDadarMNS #म #मराठी #mnsreport pic.twitter.com/I5c4X8ngZH
— MNS Report (@mnsreport9) October 26, 2020