मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
टॅग: mns
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीचा निर्णय स्थगित
पुणे : पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. खरंतर, मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. मनसेच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळाली […]
मनसेचे गृहमंत्री अमित शहांना पत्र, लाऊडस्पीकर हटवण्याची केली मागणी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून तातडीने ध्वनिक्षेपक काढण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक अध्यक्षांनी केली आहे. मनसे नाशिक अध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मशिदींतील […]
मी माझ्या साहेबांसोबत… वसंत मोरे यांच्याकडून पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांना पक्षाच्या पुणे विभागाच्या प्रमुख पदावरून हटवल्याच्या एका दिवसानंतर त्यांना विविध राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या. त्यानंतर ते पक्ष सोडणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरे यांनी सुरुवातीपासूनच ते मनसेतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी ट्विट करत मी माझ्या साहेबांसोबतच असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच फोटो […]
महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा… राज ठाकरे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर […]
ब्रेकिंग : वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरेंना न्यायालयाकडून दिलासा
नवी मुंबई: वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 2014 साली वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अनेक वेळा समन्स पाठवूनही राज ठाकरे उपस्थित न राहिल्याने बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते. या प्रकरणात आज राज ठाकरे यांना जामीन मिळाला आहे. आज राज ठाकरे स्वत: वाशी कोर्टात हजर झाले होते. […]
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेकडून फसवणूकीची तक्रार दाखल
मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. […]
मनसेच्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने घेतली माघार, लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार
मुंबई : मनसेने केलेल्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने काहीशी माघार घेतल्याचं दिसत आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी सांगितलं की, अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे नेत्यांसोबत चर्चा केली. आम्ही […]
खळ्ळखट्याक… पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं मनसे कार्यकर्त्यांनी फोडली
मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात […]
वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडल्या त्यांच्या अडचणी
आज राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. कोरोना महासाथीत अनेक वित्तीय संस्थांनी (बॅंका, एनबीएफसी, पतपेढ्या) वाहतूक व्यावसायिकांचं आर्थिक शोषण केलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वाहतूक व्यावसायिक संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यासंबंधी सर्व बँक आणि फायनान्स कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करेन, […]