मुंबई : मुंबई पोलिसांनी सापळा रचून टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला गांजा खरेदी करताना रंगेहात पकडलं. तिच्याकडून ९९ ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तिच्यासोबत आणखी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या प्रितिकाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात आणखी काही सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रीतिका चौहान सावधान इंडिया, सीआयडी, संकटमोचन महाबली हनुमान यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. देवो के देव महादेव या मालिकेमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. मात्र गेल्या काही काळात ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे.