TRP scam
महाराष्ट्र मुंबई

गुन्हे शाखेला मोठे यश, टीआरपी प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अभिषेक कोळवडे याला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने अटक के ली. घोटाळ्यात सहभागी सर्वच वाहिन्यांसाठी अभिषेक याने गुन्हे, अवैध कामे के ल्याचा दावा गुन्हे शाखेने केला. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने वकिलामार्फत रविवारी दुपारी गुन्हे शाखेच्या विशेष पथकासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला दंडाधिकारी न्यायालयात हजर के ले जाईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चार ते पाच आरोपींनी चौकशीदरमयान अभिषेकचे नाव घेतले. ग्राहकांना फितवून, पैशांचे आमिष दाखवून कृ त्रिमरीत्या टीआरपी वाढवून घेतलेल्या बहुतांश वाहिन्यांचे पदाधिकारी अभिषेकच्या संपर्कात होते. वाहिन्या अभिषेकला पैसे देत. अभिषेत त्यातली रक्कम ग्राहकांना फितवणाऱ्या सहकाऱ्यांना वाटे. या आर्थिक व्यवहारांसह अभिषेकने वाहिन्यांसाठी विविध प्रकारची अवैध कामे के ल्याचा संशय गुन्हे शाखेने वर्तवला.

कोणालाच त्याचे खरे नाव, ठावठिकाणा किंवा संपर्क क्रमांक याबाबत काहीच ठाऊक नव्हते. प्रत्येकाला तो अमीत, अजित, महाडिक अशी खोटी ओळख सांगे. चार ते पाच वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या नावे त्याने सीमकार्ड विकत घेतले होते.

रिपब्लिक, न्यूज नेशन आणि महामूव्हीज वाहिन्यांच्या चालक किंवा मालक आणि संबंधीत व्यक्तींचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाला. हे सर्व वॉण्टेड आरोपी असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. अभिषेकच्या अटके ने घोटाळ्यात सहभागी वाहिन्यांच्या प्रतिनिधींबाबत नेमकी माहिती मिळू शके ल, असा दावा अन्य अधिकाऱ्यांनी के ला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत