Mumbai Metro to run from tomorrow
महाराष्ट्र मुंबई

मेट्रो सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत, ग्रंथालये आजपासून सुरु

राज्य सरकारने मेट्रो रेल्वे, ग्रंथालये सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली मेट्रो रेल्वे सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्याआधी रविवारपासून मोनोरेल्वेही धावणार आहे. मुंबईतील बेस्ट बस सेवेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी वर्सोवा- घाटकोपर मेट्रो सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ऑनलाइनच सुरू राहणार असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधी नियमांचे पालन करून गुरुवारपासून कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

घाटकोपर – वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८.३० पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

मेट्रो १ च्या व्यवस्थापनाकडून अंतरनियम पाळणे, दोन प्रवाशांमध्ये अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा या टप्प्यात एका वेळी एका मेट्रोतून केवळ ३०० जण प्रवास करू शकतील. कोरोनापूर्व काळात याच मेट्रोतून सुमारे १,३५० जण प्रवास करत होते. प्रवासासाठी प्लास्टिक टोकन वापरण्याऐवजी मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रिचार्ज कार्डचा वापरही वाढवला जाईल. हे पर्याय वापरता न येणाऱ्यांना छापील तिकीट मिळेल. सोमवारपासून किती मेट्रो फेऱ्या चालविण्यात येतील, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत