Heavy Rain in Pune city and district

पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपलं, आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पुणे

पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने पेठांमध्ये सर्व भागांत पाणी साचले होते. ५० हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. मदतीसाठी अग्निशामक विभागाच्या कार्यालयमध्ये सतत फोन सुरु होते. पावसात अनेक नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांना टेबलवर बसून काम करावं लागलं.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत