मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आता पुस्तकाच्या रुपात सगळ्यांसमोर येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे या लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार असून यामध्ये त्या आपली प्रेमकथा सांगणार असल्याची माहिती आहे.
अधिक माहितीनुसार, करुणा मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट करत याची घोषणा केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून धनंजय मुंडे यांच्या आयुष्यातल्या आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात आणि याचा त्यांच्या राजकीय आयुष्यावर काही परिणाम होणार का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
‘# Karunadhananjaymunde माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जिवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असुन त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे’ असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एक फोटोही शेअर केला असून एक आश्चर्यजनक प्रेमकथा असंही त्यावर लिहण्यात आलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यातून ते बाहेर आले, पण आता या प्रेमकथेमुळे धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.




