The injection ordered for the dogs was found near the body of Sheetal Amte

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन डॉ. शीतल आमटे यांच्या मृतदेहाजवळ आढळलं होतं

महाराष्ट्र

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्येपूर्वी कुत्र्यांना देण्यासाठी नागपूरमधील फार्मासिस्टकडून इंजेक्शन्स मागवली असल्याचं फार्मासिस्टच्या चौकशीत स्पष्ट झालं आहे. यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटिंगही उपलब्ध आहे. ‘अॅनेस्थेशिया’ श्रेणीतील ही इंजेक्शन्स असून मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी 1 शीतल यांच्या मृतदेहाजवळ तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आता या दिशेने तपस सुरु केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत