Brutal Murder Of An Elderly Couple in Aurangabad

औरंगाबाद येथील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा, त्यांच्या मुलानेच केला धक्कादायक खुलासा…

औरंगाबाद क्राईम महाराष्ट्र

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या देवेंद्र कलंत्री याने केली होती. खून करण्यासाठी त्याने तीन फुटांची लोखंडी पहार वापरली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गारखेडा परिसरातील गजानननगर येथील व्यापारी श्यामसुंदर हिरालाल कलंत्री (६१) आणि अश्विनी श्यामसुंदर कलंत्री (४५) यांची निर्घृण हत्या त्यांचा मुलगा देवेंद्र श्यामसुंदर कलंत्री (२७) याने केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेने देवेंद्रला शिर्डीत लॉजमध्ये पकडले. सोमवारी रात्री त्याची बहीण वैष्णवीच्या तक्रारीवरून देवेंद्रविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

देवेंद्र कलंत्री याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. कॉलनीतील एका टेलर महिलेसोबत त्याची मैत्री होती. तिला टेलरिंगचे साहित्य विकल्यानंतर तिच्याकडून ७०० रुपये का घेतले नाहीत, म्हणून आई-वडिलांनी शुक्रवारी रात्री त्याच्यासोबत भांडण केले. सावत्र आई सांगेल तसेच वडील वागतात, म्हणून त्या दोघांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याने सांगितले कि, शनिवारी वडील बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी गेले तेव्हा घरी आईच्या डोक्यात पहार घालून तिचा खून केल्याचे . घरात रक्त सांडल्याने वडील येण्यापूर्वी कपड्याने रक्त पुसले. तसेच आईचे प्रेत दिवाणात ठेवले. वडील आले, तेव्हा जिन्यातच त्यांच्या डोक्यात पहारीचा जोरदार प्रहार करून त्यांनाही संपविले.

हत्या करण्यासाठी वापरलेली पहार आणि रक्ताचे डाग पुसण्यासाठी वापरलेले कपडेही पोलिसांनी पंचासमक्ष मंगळवारी जप्त केले. त्यानंतर तो दोन दिवस त्याच्या बहिणीशी खोटे बोलत होता. अटक केल्यानंतर आता पश्चात्ताप होत असल्याचे तो सांगत आहे. त्याचा हा पश्चात्ताप म्हणजे नाटक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

देवेंद्रला मंगळवारी दुपारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. आरोपीचे या हत्येत कुणी साथीदार आहेत का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी कोणी मदत केली, या हत्येचे आणखी काही कारण आहे का, यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. न्यायालयाने त्याला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

औरंगाबाद पुन्हा हादरलं! घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले दाम्पत्याचे मृतदेह, मुलगा फरार

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत