Two bodies were found in a canal in Fursungi village
महाराष्ट्र मुंबई

जोडीदारासोबत संभोग करताना 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतील हॉटेलमध्ये घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना 61 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृत व्यक्ती सकाळी १० वाजता उपनगरातील कुर्ला येथील हॉटेलमध्ये ४० वर्षीय महिलेसह आला होता, या व्यक्तीने त्याच्याबरोबर असलेली महिला आपली प्रेयसी असल्याचे सांगितले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय माणूस ४० वर्षीय महिलेसह कुर्ला येथील हॉटेलमध्ये आला होता. त्यांनी एक रुम घेतली होती. हा माणूस वरळी येथील रहिवासी असून एका खासगी कंपनीत काम करत होता. महिलेने हॉटेलच्या रिसेप्शनशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की तो माणूस बेशुद्ध पडला होता आणि प्रतिसाद देत नाही. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला सायन येथील नागरी रुग्णालयात दाखल केले, मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कुर्ला पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. महिलेला नंतर कुर्ला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. महिलेने सांगितले की संभोग करताना या व्यक्तीने दारू पिण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बेशुद्ध पडला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

अधिकाऱ्याने सांगितले कि, “आम्ही प्राथमिक माहितीच्या आधारे या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे आणि मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि त्याने कोणतीही टॅब्लेट घेतली होती का हे शोधण्यासाठी त्याच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत