Ajit Pawar

अजित पवारांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक, म्हणाले – ‘ते करिष्माई नेते’

जळगाव महाराष्ट्र राजकारण

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले. पवार म्हणाले की, या दोन नेत्यांमुळेच आज देशातील बहुतांश राज्यात भाजपचे सरकार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वाजपेयींच्या काळातील भाजपची तुलना
नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपची तुलनाही पवारांनी केली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते, मात्र मोदींच्या कार्यामुळे आणि करिष्म्यामुळे भाजपने केंद्रात दोनदा स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. बहुतेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहे. एप्रिलमध्येही पंतप्रधानांचे कौतुक करताना पवार म्हणाले होते, 2 खासदार असलेल्या भाजपला 2014 आणि 2019 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करता आले ते केवळ मोदींमुळे.

महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले पण महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेले आहेत. राज्यातील असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या घरावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छापे टाकण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत