पुणे : महाराष्ट्र शासन खेळाला महत्व देत असून शहरी आणि ग्रामीण भागात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि आपले क्रीडाकौशल्य विकसीत करण्याची संधी मिळेल, या […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम
अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर […]
सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी गूड न्यूज, सामन्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय…
अहमदाबाद : राजस्थान रॉयल्ससाठी आज सर्वात महत्वाचा सामना सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राजस्थानच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण यापूर्वीच्या सामन्यात राजस्थआनला गुजरातकडून पराभवाचा धक्का बसला होता. पण पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे सर्वात महत्वाचे […]
भारताने तब्बल १६ गोल करत पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का..
जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले. पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत […]
ट्रेलब्रेझर्स संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही व्हेलॉसिटी संघाला मिळालं फायनलचं तिकीट
पुणे : पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या महिला टी20 चॅलेंज 2022 च्या अंतिम फेरीसाठी व्हेलॉसिटी संघ पात्र ठरला. हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी जिंकला. या विजयात सब्भीनेनी मेघना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी मोलाचे योगदान दिले. जेमिमाहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, पराभूत होऊनही वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यात वेलोसिटी संघाने नाणेफेक […]
गुजरात टायटन्स संघ आयपीएलच्या फायनलमध्ये दाखल, अखेरच्या षटकात थरारक विजय
कोलकाता : डेव्हिड मिलरच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने आयपीएलच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. मिलरने यावेळी ३८ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६८ धावांची खेळी साकारली आणि गुजरातला सात विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातचा संघ थेट अंतिम फेरीत दाखल झाला आहे. हार्दिक पंड्याने यावेळी नाबाद ४० धावा करत मिलरला चांगली […]
श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिस छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल
श्रीलंका : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसला छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे 23व्या षटकात मैदानाबाहेर नेण्यात आले. कुसल मेंडिसला छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा एक भाग म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेंडिसला ढाका येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या […]
ब्रेकिंग! माजी कबड्डीपटू उदय चौटा यांचे निधन
मंगळुरू : भारतीय कबड्डी संघाचे माजी सदस्य आणि एकलव्य पुरस्कार प्राप्त करणारे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पहिले कबड्डीपटू उदय चौटा यांचे शनिवारी पहाटे (21 मे) निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर मंगळुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दशकांच्या क्रीडा कारकिर्दीत, उदय यांनी 100 हून […]
IPL 2022 : आज चेन्नई सुपर किंग्जची अखेरची मॅच
मुंबई : आयपीएल 15 च्या 68 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने असतील. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. राजस्थानने 13 सामने खेळले आहेत आणि 8 जिंकले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.304 आहे. तर 13 सामने खेळून CSK संघ फक्त चार सामने […]
भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक
भारतीय मुष्टियोद्धा निखत जरीनने गुरुवारी इस्तांबुल येथे महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्लायवेट (५२ किलो) फायनलमध्ये थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासचा ५-० असा सहज पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. जरीनच्या सुवर्ण पदकाव्यतिरिक्त, मनीषा मौन (57 किलो) आणि नवोदित खेळाडू परवीन हुडा (63 किलो) कांस्यपदकांसह मायदेशी परततील. तेलंगणाची बॉक्सर निखत जरीनने तिच्या थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 5-0 ने एकतर्फी विजय मिळवला. या […]










