पुणे : पुण्याच्या 75 गावांमध्ये झिका विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या गावांमध्ये लसीकरणाला गती देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, पुण्यातील बेलसर गावामध्ये झिका विषाणूचा धोका कमी करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला जात आहे. पंचायतीने गावातील महिलांना 4 महिने गर्भधारणेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी आरोग्य विभागाची टीम घरोघरी जाऊन त्यांचे समुपदेशन करत […]
पुणे
डाटा केअर कार्पोरेशन कंपनीकडून पोलिसांना पावसाळी रेनकोटचे वाटप!
पुणे : डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या प्रयत्नातून डेक्कन परिसरात असलेले डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी) कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्या सहयोगाने डेक्कन पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना 150 पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी उभे राहिले. […]
दुःखद! आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन
पुणे : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज (१० ऑगस्ट) निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक […]
अनर्थ टळला! मुलगी इमारतीच्या छतावरून खाली कोसळली, पण प्रसंगावधान राखल्याने वाचला जीव…
पुणे : इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी ऋतुजा जगदाळे हिचे घर पुण्यातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये आहे. ती आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केस वाळवायला इमारतीच्या छतावर गेली होती, त्यावेळी अचानक ती पाय घसरून खाली कोसळली. मात्र, सुदैवाने खाली कोसळताना तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या ग्रीलला पकडले. त्यानंतर, या मुलीला वाचवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा जगदाळे हिचे […]
पुणेकरांना मोठा दिलासा! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता
पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत घोषणा केली आहे. बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे […]
घरकाम करायला आली आणि तिजोरीच चोरून घेऊन गेली, मास्क वापरल्याने तिचा चेहरा पाहिलाच नाही..
पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात ज्येष्ठ दाम्पत्याकडे काम करणाऱ्या महिलेने २४ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज तिजोरीसकट चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार या महिलेच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व […]
पुण्यात गॅरेजला भीषण आग, 3 बस जळून खाक तर 2 जण जखमी
पुणे : पुणे शहरातील उत्तमनगरमधील कोपरे गाव येथे एका गॅरेजला आग लागून गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळाल्यानंतर पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोपरे गाव येथे बस आणि इतर […]
16 कोटींच्या इंजेक्शननंतरही वेदिकाचे दुःखद निधन
पुणे : क्राऊड फंडिंगमधून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता अचानक वेदिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिका आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए […]
महाराष्ट्रात आढळला झिका विषाणूचा पहिला रुग्ण, जाणून घ्या काय काळजी घ्यावी…
पुणे : महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेपुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर गावात राज्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 55 वर्षीय महिलेत झिका विषाणू आढळला होता. तो रुग्ण जरी बरा झाला असला तरी त्याची बाधा अनेकांना झाल्याची शक्यता असल्याने बेलसर परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला […]
कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – अजित पवार
पुणे : पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन […]










