पुणे : सध्या पुणे शहर व जिल्ह्यांमधून तडीपार असलेला गुंड अजिंक्य काळे हा प्राणघातक शस्त्र घेवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्यासाठी आंबेगाव पठार येथे आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना […]
पुणे
आनंदाची बातमी! पुणे शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी बडीकॉप योजना सुरु, जाणून घ्या…
पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे. घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास […]
पुण्यात खळबळ! प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून, नंतर केला चोरीचा बनाव…
पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला, त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरून पळ काढला. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांच्या विवाहित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी किसन सीताराम जगताप (वय […]
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे
पुणे : पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली. पुणे विभागातील पुणे, […]
मी माझ्या साहेबांसोबत… वसंत मोरे यांच्याकडून पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांना पक्षाच्या पुणे विभागाच्या प्रमुख पदावरून हटवल्याच्या एका दिवसानंतर त्यांना विविध राजकीय पक्षांच्या ऑफर आल्या. त्यानंतर ते पक्ष सोडणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मोरे यांनी सुरुवातीपासूनच ते मनसेतच राहणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्यांनी ट्विट करत मी माझ्या साहेबांसोबतच असल्याचे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच फोटो […]
पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील
पुणे : परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राण्यांच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशालिटी) […]
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मालवाहू ट्रकला धडकल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मालवाहू ट्रकला कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (9 एप्रिल) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, स्थानिक पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. ही कार मुंबईच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली […]
मोठी बातमी! कोविशील्ड लसीचे दर कमी करण्याचा निर्णय, आदर पूनावाला यांची घोषणा
पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस 600 रुपयांवरून 225 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी माहिती दिली आहे. आदर पूनावाला यांनी ट्विट करत म्हटले कि, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, सीरमने […]
पुणे हादरले! १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार
पुणे : पुण्यातील स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालयात एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पुणे स्टेशनजवळील सार्वजनिक सेवा प्रसाधनगृहात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह पुणे […]
पुण्यातील कात्रज परिसरात सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट
पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 20 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. याठिकाणी असलेल्या एका शेडमधे बेकायदा गॅस रिफिलिंग […]










