The young man killed his own mother and burned her body in the yard
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून, नंतर केला चोरीचा बनाव…

पुणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात प्रियकराने प्रेयसीचा भिंतीवर डोके आपटून खून केला, त्यानंतर चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरून पळ काढला. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदूवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सुनीता यांच्या विवाहित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी किसन सीताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि. पुणे) याला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, किसन व सुनीता या दोघांत गेल्या १० ते १२ वर्षांपासून संबंध होते. सुनीता त्याला लग्नासाठी तगादा लावत होत्या आणि किसनला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. त्यातूनच त्याने प्लॅन करून हा खून केला. आरोपीने शनिवारी ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता एक कोल्डड्रिंकची बाटली घेतली. त्यात झोपेच्या गोळ्या टाकून ते सुनीताला पाजले. तिच्यासोबत गप्पा मारण्याचे नाटक केले. त्यानंतर तिला गुंगी येताच जोरात तिचे डोके भिंतीवर आदळले. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तो सुनीता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड हा ऐवज चोरून पळून गेला.

हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास सुनीता यांच्या मुलीच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ हडपसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाच्या जाळ्यात आरोपी अडकला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, कर्मचारी रमेश सावळे, आश्रुबा मोराळे, प्रमोद टिळेकर यांनी किसनला राहत्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत