पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या […]
पुणे
पुणे हादरले! वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्वतःच्या मुलाविरुद्ध आईने केली तक्रार
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सुस गाव परिसरात वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वृद्ध आईनेच याबाबत फिर्याद दिली असून हे प्रकरण उजेडात […]
पुणे मनपा हद्दीत समाविष्ट ११ गावांमध्ये सवलतीच्या दराने पाणीपट्टी आकारणी
पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये करण्यात आला असून या गावांची कर आकारणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार करण्यात आली आहे, तर पाणीपट्टीही सवलतीच्या दराने आकारण्यात आली आहे, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य संजय जगताप, चेतन तुपे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले की, […]
पुण्यात घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांकडून अटक
पुणे : पुणे शहरामध्ये घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलम लावण्यात आलेले अनोळखी आरोपी सोनीया अपार्टमेंट, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड, पुणे येथे घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील आरोपीतांनी सोसायटीचे वॉचमन आणि पोलिसांच्या अंगावर त्यांच्या बॅगमधील दगड-विटा फेकुन मारल्या, […]
दुःखद! पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
पुणे : तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेत मयूर रामदास घोडे (10), आनंद विजय खाडे (11) आणि साहिल रंगनाथ घोडे (14) या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही घटना घडली. निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मयूर, आनंद आणि साहिल रविवार (१३ […]
पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकी जाधव पोलिसांच्या ताब्यात
पुणे : पुण्यात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड विकास ऊर्फ विकी जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. मागच्या महिन्यात विकी जाधवने त्याच्या साथीदारांसह अभिजित दिघे यांच्या डोक्यात दगड मारुन त्यांना गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पत्नी व मुलाचा खुन करण्याची धमकी देखील दिलेली होती. त्यानंतर तो पुण्याबाहेर पळून गेला आणि […]
पुणे हादरले! दहावीत शिकणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार…
पुणे : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वडगाव शेरी हद्दीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. एक तर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना वडगाव शेरी येथे घडली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तात्काळ या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर वडगाव […]
तीन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, फोटोशूट करताना घडला अनर्थ…
पुणे : तीन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडली आहे. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. दौंड शहरातील कुरकुंभ रस्त्यावरील मोरवस्तीजवळ महापालिकेच्या पाणी साठवण तलावात तीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तलावावर फोटोशूट करताना पाण्यात पडून तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. असरार अलीम काझी (21), […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन […]
विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील सुधारणा नवयुवकांसाठी संधी; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पुणे : देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे ‘सिम्बॉयोसिस‘च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘सिम्बॉयोसिस आरोग्य धाम‘चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री […]









