rapecase
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे हादरले! १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

पुणे : पुण्यातील स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालयात एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पुणे स्टेशनजवळील सार्वजनिक सेवा प्रसाधनगृहात ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह पुणे स्टेशन परिसरात राहते आणि साफ-सफाईचे (क्लिनर) काम करते. शुक्रवारी दुपारी आरोपी तिच्या मागे सार्वजनिक शौचालयात गेला. त्यानंतर त्याने तिला धक्का देऊन खाली पाडले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर आरोपी तिथून पळून गेला. दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आले.

पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व माहिती दिली आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मारवाडी नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांच्या परिचयातला आहे. तो दररोज पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला भेटायला जायचा. मात्र, या घटनेपासून तो बेपत्ता आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत