जळगाव : जळगाव न्यायालयाने लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणात तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. केवळ तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा जाहीर केल्याच्या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील तीन वर्षीय बालिकेवर घराशेजारीच राहणाऱ्या किशोर भोई या […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण
जळगाव : राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसेंना याआधी दोनवेळा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना आता पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली […]
जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
सांगली : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा तात्पुरती स्थगित केली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच […]
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आणखी किती वर्षे टोल वसुल करणार? हायकोर्टाने केला सवाल
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होत असलेल्या टोलवसुलीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रश्न उपस्थित केला. आणखी किती वर्षे टोल वसुल करणार आहात?, असा सवाल मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं आज (१७ फेब्रुवारी) उपस्थित केला. या एक्सप्रेसवेसाठी झालेला खर्च अजून वसूल झाला नाही का?, जमा होणार्या टोलचा महसुल सरकारी तिजोरीत जमा […]
महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी ३३ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास
मुंबई : महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास, महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे, शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती आदी विकासकामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. […]
मंत्रिमंडळ निर्णय : आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : पर्यटन धोरण-2016 मधील तरतूदीनुसार तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे 2 भाग […]
राज्यात आज आणि उद्या पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता
राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहेत, त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून थंडी जाणवत आहे. मात्र दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पुन्हा लॉकडाऊन?… नियम न पाळल्यास कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केल्या ‘ह्या’ सूचना
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या […]
ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांना अॅसिड फेकण्याची धमकी, धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर […]
संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं कि, संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही. संजय राऊत म्हणाले कि, “हा […]










