मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असतानाच महाराष्ट राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्यानं वेग आला आहे. लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनानं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला मोफत लसीकरणाचा मुद्दा अखेर निकाली निघाला. महाराष्ट्र वासीयांना खुशखबर देत राज्यातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
लोटे एमआयडीसीत पुन्हा भीषण आग, एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत पुन्हा एका कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरल्याचे माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. स्फोट […]
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पितृशोक, काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन
मुंबई : काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना ब्रीच […]
पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटला आग; चार रुग्णांचा मृत्यू
ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मिळालेल्या माहिती नुसार, […]
‘तो’ व्हिडिओ पाहिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, कोणत्याही कारवाईला घाबरत नाही – खासदार सुजय विखे
नगर : खासदार सुजय विखे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्यावर आपले मत स्पष्ट शब्दांत मांडले आहे. आपल्याकडे सर्व कागदपत्रे आहेत असून कोणत्याही कारवाईला आपण घाबरत नाही. इंजेक्शनमुळे ज्यांचे जीव वाचले, ते लोक माझ्या पाठिशी आहेत. ती इंजेक्शन संपली आहेत. इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे जप्त काय करणार? माझा तो व्हिडिओ नीट पाहिला तर सर्व […]
महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी; हॉस्पिटलमध्ये अत्याचाराचा प्रयत्न
नागपूर: महिला डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्येच शारीरिक सुखाची मागणी करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मधील कोराडी मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून सहकारी डॉक्टरला अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. नंदु रहांगडाले (वय ३९) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. पीडित […]
महसूलमंत्री थोरात यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, यंत्रणा कमी पडतेय म्हणत नमूद केल्या अनेक त्रुटी…
अहमदनगर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी निरीक्षणे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना कळविली आहेत. स्वत:च्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे, आपण नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा […]
महाराष्ट्रात १ मेपासून होणाऱ्या लसीकरण मोहीमवर प्रश्नचिन्ह…
मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]
दिलासा! महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट लवकरच पूर्णपणे ओसरणार
मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असे टास्क फोर्समधील डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोनाची […]
WhatsApp ग्रुपच्या अॅडमिनला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
मुंबई : व्हॉट्स अॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्रुप अॅडमिनला मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च […]










