मुंबई : राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच पोलिसांची पळापळ, सुरक्षा वाढवली…
मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी […]
खळबळ! अल्पवयीन मुलीचा वृद्धाने घरात घुसून केला विनयभंग
अमरावती : एका १६ वर्षीय मुलीचा एका वृद्धाने तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही मुलगी तिच्या काकाच्या घरी गेली होती. तिथेच या वृध्दाने अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे मुलगी घाबरून ओरडली. त्यावेळी पीडित मुलीच्या दोन बहिणी पळत आल्यानंतर तो वृध्द […]
मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ प्रकल्प राबविणार
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी […]
प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (Maharashtra Tourism Development Corporation -MTDC) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या […]
शहीद जवान जिजाभाऊ मोहिते यांना अखेरचा निरोप
परभणी : भारतीय हवाई दलातील जवान जिजाभाऊ किशनराव मोहिते यांच्यावर शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पूर्णा तालुक्यातील महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जिजाभाऊ यांच्या कुटुंबीयांनी धार्मिक रीतीनुसार अंत्यविधी पूर्ण केला. पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. तसंच, हवाई दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी, शहीद जिजाभाऊचे […]
‘हा’ काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी व भाजपवर सणसणीत टीका
मुंबई : नरेंद्र मोदी व भाजपनं २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून जिंकल्या. विरोधकांवर यथेच्छ चिखलफेक केली. आता या सोशल मीडियामध्ये कोरोना हाताळणीसंदर्भात नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची बदनामी होत आहे. हा काळानं त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे,’ अशी सणसणीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपनं आरोप […]
अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं निधन झालं आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात […]
रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे
पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त आरक्षण रद्द, राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा निर्णय सुनावला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं अतिरिक्त राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. याअगोदर, महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम १२ […]










