मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी […]
मुंबई
मोहफुल उत्पादनातून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ प्रकल्प राबविणार
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफुल – आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी […]
प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (Maharashtra Tourism Development Corporation -MTDC) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या […]
अभिनेता भूषण कडू यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेता भूषण कडू यांची पत्नी कादंबरी कडू यांचं निधन झालं आहे. त्या ३९ वर्षांच्या होत्या. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादंबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात […]
नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने, मराठा आरक्षणाबाबत संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पुढे काय करावं लागेल, याबाबतही राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं कि, “संभाजीराजे […]
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनुभव व धड्यांच्या आधारे सुयोग्य नियोजन करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ निर्देश
मुंबई : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनाविषयक जनहित याचिकांविषयीच्या सुनावणीनंतर न्या. अमजद […]
सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासन सज्ज पण…
मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा […]
महाराष्ट्रात होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच विलगीकरणात राहावं लागणार, म्युकरमायकोसिस नोटीफाईड आजार घोषित
मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे […]
१ जूननंतर लॉकडाऊनचे निर्बंध होणार शिथिल, राज्य सरकारकडून नियोजन सुरु, जाणून घ्या…
मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, तरीही राज्यातील संचारबंदी तातडीने मागे न घेता निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात येईल. राज्य सरकारकडून सावध पावले टाकण्यात येणार आहेत. कडक निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांत दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे […]
याचिकेत ‘ते’ विधान तुम्ही कसं केलं? न्यायालयाचा परमबीर सिंग यांना सवाल, 9 जूनला पुढील सुनावणी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना 9 जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी हमी देतानाच तोपर्यंत परमबीर सिंह यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही राज्य सरकारने आज (24 मे) मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील एका मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं परमबीर […]










