इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
कॅनडातील टोरंटो येथे भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या
नवी दिल्ली : कॅनडाच्या टोरंटोमध्ये एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या अनेक जखमा झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या तरुणाचे नाव कार्तिक वासुदेव असून टोरंटोमधील सबवे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारामुळे अनेक जखमा झालेल्या वासुदेवला ऑफ-ड्युटी पॅरामेडिककडून वैद्यकीय मदत मिळाली आणि […]
महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच दिला मुलाला जन्म, गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती…
ऑस्ट्रेलिया : एका महिलेने शॉवर घेताना बाथरूममध्येच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, या महिलेसाठी हा खूपच मोठा धक्का होता, कारण ती गर्भवती असल्याची त्या महिलेला कल्पनाच नव्हती. डीमिटी बोनेट (Dimitty Bonnet) या २८ वर्षीय महिलेला अगोदरच २ मुले आहेत, डिमिटी आणि तिचा पती जेसन (वय 42) यांना ती गरोदर असल्याची माहिती नव्हती. आश्चर्यजनक गोष्ट अशी […]
WHO चा धक्कादायक संशोधन अहवाल, जगातील 99% लोकांचा फुफ्फुसापर्यंत पोहोचतेय स्लो पॉइझन
WHO Report : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक धक्कादायक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की जगातील 99% लोक विषारी हवेच्या संपर्कात श्वास घेत आहेत. वायू प्रदूषणाचा थेट परिणाम तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचत आहे, तुम्ही श्वास घेत असलेली हवा इतकी दूषित झाली आहे की ती सुधारली नाही तर श्वास घेण्यायोग्य हवाच राहणार नाही. […]
ब्रेकिंग! दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या दोन ट्रेनर विमानांची धडक, तीन पायलट ठार
दक्षिण कोरियाच्या हवाई दलाच्या ट्रेनिंगदरम्यान दोन ट्रेनर विमानांची धडक झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात तीन पायलट ठार झाले असून अन्य काहीजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व शहरातील साचॉनमधील KT-1 विमान तळाजवळ दुपारी 1:35 वाजता (0435 GMT) हा अपघात झाला. येथे हवाई दलाकडून तपासणी करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकार्यांचा हवाला देऊन, योनहाप वृत्तसंस्थेने […]
Video : अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे ६० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
अमेरिका : अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बर्फामुळे अंधुक वातावरण निर्माण झाल्याने समोरचं काहीही दिसू न शकल्यानं जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या बऱ्याचशा गाड्यांचं […]
रशियाने उत्तर अटलांटिक समुद्रात सोडल्या अण्वस्त्र पाणबुड्या
Ukraine-Russia War : युक्रेन-रशिया युद्धपरिस्थिती अधिकच बिकट होताना दिसत आहे. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर त्यांच्या अण्वस्त्र पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात पाठवल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपातील अनेक देश आहेत. वृत्तानुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चात्य देशांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिल्यानंतर एक दिवसानंतर उत्तर अटलांटिकमध्ये आण्विक पाणबुड्या पाठवल्या […]
शास्त्रज्ञ चिंतेत! मानवी रक्तामध्ये पहिल्यांदाच सापडले मायक्रोप्लास्टिक, धोक्यांविषयी जाणून घ्या…
जगात पहिल्यांदाच मानवी रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. शास्त्रज्ञांना तपासणीदरम्यान असे आढळले की 80 टक्के लोकांमध्ये हे लहान कण आढळून आले. या शोधातून असे दिसून आले आहे की मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि मानवी अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. तथापि, मानवी आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तथापि, […]
श्रीलंकेत एक लिटर दुध मिळतंय दोन हजार रुपयांना, श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट का झाली? जाणून घ्या…
श्रीलंका : श्रीलंका आजवरच्या सर्वात बिकट अन्न संकटाचा सामना करत आहे. देशात सर्वच जीवनावश्यक अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. खालच्या वर्गाची अवस्था तर वाईट आहेच, पण कामगार वर्गाचीही अवस्था वाईट आहे. लोकांना देश सोडून स्थलांतर करणे भाग पडले आहे. श्रीलंकेत तीन दिवसांत दुधाच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. […]
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना कोरोनाची लागण
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा घास दुखत असून इतर कोणतीही लक्षणे नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी ट्विट करत सांगितले की नुकतीच माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझा काही दिवसांपासून घसा खवखवत आहे, पण मी बरा आहे. त्यांनी पुढे सांगितले की ‘मिशेल आणि मी लसीकरण केल्याबद्दल कृतज्ञ आहोत. तिची […]










