मुंबई : दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सनम बेवफा, सौतन, साजन बिना सुहागन या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. ते त्यांच्या चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत संजीव कुमार ते मेहमूद जूनियर उर्फ […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा, 15 दिवसांनंतर उघडले डोळे
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात आहेत. राजू हे सध्या दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांना शुद्धी आली आहे. राजूच्या व्यवस्थापकाने सांगितले की कॉमेडियनची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे. व्यवस्थापकाने पुढे सांगितले की एम्समधील डॉक्टर देखील त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून […]
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण
मुंबई : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत आपल्या नवीन ट्विटमध्ये माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “माझी कोरोना चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे… माझ्या आसपास आणि आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःचीही तपासणी करून घ्या.” T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that […]
ब्रेकिंग! सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
गोवा : भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती तिच्या काही कर्मचाऱ्यांसह गोव्याला गेली होती. ती 42 वर्षांची होती. तिला काल रात्री हृदयविकाराचा झटका आला. तिने तिच्या कर्मचाऱ्यांकडे तिला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर […]
‘हेरा फेरी’ चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे आज पहाटे ३ च्या सुमारास बॉम्बे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. अब्दुल यांचा मधुमेह आणि दमा यासह अनेक आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज इर्ला मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते फिरोज नाडियादवाला यांचे वडील आहेत. गफ्फारभाई या नावाने ओळखले जाणारे, […]
गुड न्यूज! सोनम कपूरच्या घरी चिमुकल्याचे आगमन, नीतू कपूर यांनी दिली माहिती
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आई झाली असून तिला मुलगा झाला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी शनिवारी दुपारी बाळाचे स्वागत केले. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी याबाबत एक नोट शेयर केली आहे. यात त्यांनी म्हटले कि, “20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या सुंदर बाळाचे […]
KRK ने ट्विटर हँडलवर बदललं स्वतःच नाव, ‘खान’ हटवून लावलं पत्नीचं आडनाव…
मुंबई : अभिनेता कमाल रशीद खान उर्फ केआरके सोशल मीडियावर त्याच्या काही ट्वीट्स किंवा वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतो. बॉलीवूडला दररोज टार्गेट करणारा केआरके जवळपास प्रत्येक चित्रपटाबद्दल आपले विचार लोकांसोबत शेअर करतो. आपल्या चित्रपटांच्या रिव्ह्यूजमुळे नेहमीच चर्चेत असणार्या केआरकेने पुन्हा एकदा आपल्या एका ट्विटने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केआरकेने ट्विटर हँडलवर आपले नाव बदलले आहे. केआरकेने […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, मेंदूलाही हानी पोहोचल्याची डॉक्टरांची माहिती
नवी दिल्ली : राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या दोन दिवसांनंतरही ते बेशुद्ध आहेत आणि अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांच्या मेंदूचे प्रचंड नुकसान झाले आहे. एम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूला मोठा फटका बसला. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जशी […]
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतरही व्हेंटिलेटरवर
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तरीही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉकेज आहे. […]
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा शुटींग दरम्यान अपघात, पाय फ्रॅक्चर
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा शुटींग दरम्यान अपघात झाला असून त्यात तिचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिल्पा शेट्टी मागील अनेक दिवसांपासून रिएलिटी शो मध्ये जज म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत तिने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर माहिती देताना आपला पाय फॅक्चर […]









