Abdul Gaffar Nadiadwala
मनोरंजन

‘हेरा फेरी’ चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ चित्रपट निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे आज पहाटे ३ च्या सुमारास बॉम्बे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. अब्दुल यांचा मधुमेह आणि दमा यासह अनेक आरोग्य समस्यांमुळे मृत्यू झाला. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज इर्ला मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते फिरोज नाडियादवाला यांचे वडील आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गफ्फारभाई या नावाने ओळखले जाणारे, चित्रपट निर्माते 1984 पासून चित्रपट जगताचा एक भाग आहेत. निर्माते म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता धर्मेंद्र आणि रेखा अभिनीत ‘झुठा सच’, त्यानंतर त्यांनी ऍक्शन ड्रामा ‘लहू के दो रंग’ची निर्मिती केली आणि नंतर प्रियदर्शन-दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी’ ची निर्मिती केली, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कॉमेडीपैकी एक मानला जातो.

अजय देवगणने केले दुःख व्यक्त
अजय देवगणने दुःख व्यक्त करत म्हटले कि, “श्री गफ्फारभाई नाडियाडवाला यांच्या निधनाबद्दल मनापासून दुःख झालं. सिनेमाच्या सुवर्णकाळात माझे वडील आणि ते सहकारी होते. ओम शांती. नाडियादवाला कुटुंबीयांना माझ्या संवेदना.

अनेक चित्रपटांची निर्मिती
अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांनी ‘आ गले लग जा’, ‘शंकर शंभू’, ‘लहू के दो रंग’, ‘वतन के रखवाले’, ‘सोने पे सुहागा’ आणि इतर अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ते त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटाबद्दल ओळखले जायचे आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि मनापासून काम केले. गफ्फारभाई हे एम्पायर ऑडिओ सेंटर सुरू झाले, त्या काळात युसूफ लकडावाला यांच्यासोबत भागीदार होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत