11th admission
शैक्षणिक

मराठा आरक्षण कायद्याच्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उद्या (मंगळवार) मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपसमितीची बैठक होईल. या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाणार […]

school education minister varsha gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतरच- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली आहे. मात्र महाराष्ट्रात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील की नाही, याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने शुक्रवारी […]

education institutes
शैक्षणिक

शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने होणार सुरू

करोनामुळे गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था २१ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते एच्छिक आहे. दोन वर्गामध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची […]

70:30 quota system cancel
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पद्धत रद्द

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली. राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवण्यात येतात. त्यानुसार ज्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के […]

education-conference
देश शैक्षणिक

नवीन शिक्षण धोरण हे वाचण्याऐवजी शिकण्यावर फोकस करणारं- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा संदर्भातल्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. त्यावेळी २१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकऱ्या, […]

high court rejects plea to stay final year mbbs exam
शैक्षणिक

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षाच्या स्थगिती संबंधित महत्वाचा निर्णय

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करुन ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.  मागणी फेटाळण्यात आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवार, ८ सप्टेंबरपासून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेबाबत २१ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते. या […]

MHT CET exams
महाराष्ट्र शैक्षणिक

MHT-CET परीक्षेच्या तारखांबाबत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती

महाराष्ट्र सरकारने काल राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT-CET) तारखांबाबत माहिती दिली आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात सीईटी परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र सीईटी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी यासाठीच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. तर […]

10th-12th exams postpone
महाराष्ट्र शैक्षणिक

१०वी आणि १२वीच्या ऑक्टोबर २०२० सत्रातल्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या संकटामुळे १०वी आणि १२वीच्या ऑक्टोबर २०२० सत्रातल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आणि परीक्षा घेण्याची पद्धत याबद्दलची माहिती राज्यातील सद्यस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येईल. पत्रकारांशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती […]

शैक्षणिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याविषयी दिली माहिती

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकारनं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. शाळा कधी सुरू होणार याविषयी अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही. कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील […]

JEE NET EXAM
देश शैक्षणिक

नीट आणि जेईई (NEET and JEE) मुख्य परीक्षा निर्धारित वेळेतच होणार

NEET and JEE : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.जेईई आणि नीट परीक्षांसाठी […]