महाराष्ट्र सरकारने काल राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या (MHT-CET) तारखांबाबत माहिती दिली आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात सीईटी परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र सीईटी इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी यासाठीच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येतील. तर उर्वरित परीक्षा या नंतर घेण्यात येतील. काही दिवसांत वेळापत्रकांची नेमकी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.
उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट केलं आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.
— Uday Samant (@samant_uday) September 2, 2020




