मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून आज महत्वाच्या घोषणा करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी थोड्या वेळापूर्वी तातडीची परिषद घेऊन आरबीआयच्या निर्णयांची घोषणा केली. गतवर्षी प्रमाणे लॉकडाउनची झळ अर्थव्यवस्थेला बसू नये, यासाठी रिझर्व्ह बॅंकेने खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची घोषणा […]
अर्थकारण
Stay up-to-date with the latest economic news and trends from Maharashtra and across India. Our Economics section covers national and regional economic developments, government policies, market analysis, and financial insights that impact businesses, industries, and the everyday economy.
ICICI बँकेवर मोठी कारवाई, सुरक्षा बॉण्ड प्रकरणात RBI ने ठोठावला करोडो रुपयांचा दंड
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुन्हा ICICI बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय बँकेला काही मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी 2018 मध्ये बँकेला 58.9 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. त्या काळातही बँकेने सुरक्षा बॉण्डच्या विक्रीचे नियम तोडले होते. केंद्रीय बँकेने यावेळी […]
कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला. रिझर्व्ह बँक लवकरच […]
रुग्णालयाच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्त व्हा.. आर्थिक संकटातून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवा..
आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांना कोरोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत? यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात जाऊ शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून […]
ग्राहकांना मोठा धक्का..! अॅक्सिस बँकेचे व्यवहार आता महागणार, अनेक नियमांत मोठे बदल..
नवी दिल्ली : आपण अॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. आता अॅक्सिस बँकेतून पैसे काढणे महाग होणार आहे. बँकेने बचत खात्यातून रक्कम काढण्यावरील आणि SMS शुल्क वाढविले आहे. नवीन दर 1 मे 2021 पासून लागू होतील. वृत्तानुसार, 1 मे 2021 पासून अॅक्सिस बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान मासिक 15,000 […]
जोखीम नसणारी गुंतवणूक योजना शोधताय? टपाल खात्याच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा भरघोस परतावा
नवी दिल्ली : आपण अधिकाधिक परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर भारतीय टपाल विभागाची रिकरिंग डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत गुंतवणूकदाराने दररोज १०० रुपयांची गुंतवणूक केली तर मुदतपूर्तीवेळी या योजनेतून गुंतवणूकदाराला पाच लाख रुपये मिळू शकतात. पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर चांगले व्याज आणि खात्रीशीर […]
मोठी बातमी : RTGS सेवा ‘या’ दिवशी 14 तासासाठी राहणार खंडित
नवी दिल्ली : RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी (18 एप्रिल) दुपारी 2 पर्यंत म्हणजे 14 तास खंडित राहणार आहे. NEFT सेवा (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) सुरळीत सुरु राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबत माहिती दिली आहे. आरबीआयने निवेदनात म्हटले आहे की, 18 एप्रिल 2021 रोजी आरटीजीएस सेवा 00:00 वाजेपासून […]
बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय घेतला मागे, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली होती, पण तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी […]
खुषखबर : मुद्रांक शुल्कात महिलांना एक टक्का सवलत; उद्यापासून ‘हे’ असतील नवीन मुद्रांक शुल्क
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा केली होती. राज्यातील महिलांनी कोणताही फ्लॅट, घर, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेची अंमलबजावणी आता उद्यापासूनच म्हणजे १ एप्रिल 2021 […]
दिलासा : पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, या तारखे पर्यंत लिंक करता येणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. केलीय. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. ‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलीय. कोविड […]










