Minister of State for Railways Suresh Angadi dies due to corona
कोरोना देश राजकारण

देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले […]

school education minister varsha gaikwad
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण शैक्षणिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. […]

Aurangabad mayor Nandkumar Ghodele
कोरोना छत्रपती संभाजी नगर

औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण

औरंगाबाद : औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच नंदकुमार घोडेले हे […]

The number of corona patients
कोरोना महाराष्ट्र

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा, कोरोना चाचण्या वाढवा अन्यथा..

महाराष्ट्रात वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. यामुळे कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील हे लक्षात घ्या, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र […]

sudhir mungantiwar
कोरोना महाराष्ट्र राजकारण

जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना कोरोना

मुंबईः  महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना […]

amit shah
कोरोना देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS डिस्चार्ज

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज (गुरुवार) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अमित शहा हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जमावबंदी
कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंध येणार; आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू

मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या […]

Lok Sabha MPs
कोरोना देश

लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झालीय. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवनात या सर्व खासदारांची १३ आणि १४ सप्टेंबर रोजी करोना चाचणी करण्यात आली होती. करोना संक्रमित खासदारांमध्ये सर्वाधिक १२ खासदार सत्ताधारी भाजपचे, वायआरएस काँग्रेसचे दोन, शिवसेना, डीएमके आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका-एका खासदाराचा समावेश आहे. अधिवेशनाच्या […]

Corona Vaccine
कोरोना देश

कुणाला लसीवर विश्वास नसेल तर कोविड लसीचा पहिला डोस मी घेईन: डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोनावरील लस भारतात पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२१च्या सुरूवातीला उपलब्ध होऊ शकते. खर्चाचा विचार न करता आवश्यक असलेल्या रुग्णांना लस प्रथम उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच लसीची सुरक्षा, खर्च, उत्पादन या संदर्भात चर्चा सुरू आहे. कोविड लसीच्या चाचणी दरम्यान योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. जर […]