मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील भीषण परिस्थिती विषयी सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स […]
कोरोना
अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती
देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या समस्येने पीडित आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा किंवा कोरोनामुळे कमीतकमी गंभीर स्थितीपर्यंत न जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की काही व्यायाम केल्यामुळे […]
आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास आवश्यक; कसा काढायचा? जाणून घ्या
मुंबई : राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल. यासाठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना ई-पासची गरज नाही. अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना प्रवास करायचा असल्यास त्यासाठी […]
ऑक्सिजन स्तर कमी झाल्यास रूग्णांनी करा ‘हे’ उपाय, आरोग्य मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना घरी स्वत: ची काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आरोग्य मंत्रालयाने श्वासोच्छवासाच्या त्रासात कोरोना रूग्णांसाठी घरीच ब्रीदिंग करण्याचा सल्ला देत काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला माहित असाव्यात अशा काही आवश्यक गोष्टी : जर ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली गेली तर घरात विलगीकरणात असलेला रुग्ण त्यांच्या […]
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा
विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान […]
माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची बातमी खोटी, सुमित्रा महाजन यांची प्रकृती स्थिर…
नवी दिल्ली : माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर त्यांना मिळालेली माहिती चुकीची असल्याचं सांगत ट्विट डिलिटही केलं. I am relieved if that is so. I received this from what […]
ब्रेकिंग : पंतप्रधान मोदींचा बंगाल दौरा रद्द, कोरोना परिस्थितीबद्दल घेणार उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की मी उद्या पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द केला असून त्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकआहे. Tomorrow, will be chairing high-level meetings to review […]
देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती, सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना संसर्गाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वत:हून लक्ष घालत चिंता व्यक्त केली आहे. देशात आणीबाणीसदृश्यं परिस्थिती उद्भवल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, लॉकडाऊन आणि औषधांचा पुरवठा या चार मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलं कि, या राष्ट्रीय आपत्तीशी दोन हात करण्यासाठी सरकारनं काय […]
दिलासादायक! गडकरी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्राला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा
दिल्ली : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे रुग्णालयांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असून पुरवठा कमी होत आहे. अनेक रुग्णालय ऑक्सिजनसाठी विचारणा करत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने विशाखापट्टणमच्या आरआयएनएल प्लांटमधून महाराष्ट्राला आता दररोज ९७ मेट्रिक टन लिक्विड […]
कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह
पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]










