devendra fadanvis BJP
इतर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ; विचारले हे प्रश्न..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. त्यात ते म्हटले कि ठाकरे सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरु करु शकतं तर जिम का नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुधारणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार […]

mahatma gandhi spectacles biggest auction of the century
क्रीडा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दोन चष्मांचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव..

शंभर वर्षे जुने असलेले हे चष्मे गांधीजींनी वापरले असल्याने त्याला ऐतिहासिक महत्व असून, या चष्म्यांची किंमत १०,००० ते १५,००० पौंड म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ९ ते १४ लाख रुपये होईल असे सांगण्यात येत आहे. ईस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स या कंपनीच्या स्टाफला एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले आणि लेटरबॉक्समध्ये लटकत असलेले गांधीजींचे हे चष्मे १० ऑगस्ट आढळून आले. त्यानंतर त्यांनी […]

देश

दहशतवादी संघटनेकडून लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा, दिल्ली सुरक्षा व्यवस्थेत वाढ

इंटेलिजन्स एजन्सी आयबीला माहिती मिळाली आहे की, खालिस्तान आंदोलनाला पुन्हा सक्रिय करण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑगस्टला लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर केली जात आहे. खालिस्तानची मागणी करणाऱ्या दहशतवादी संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ने स्वातंत्र दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकावणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. बक्षीसाची रक्कम […]

मनोरंजन

खाजगी बेट ते खाजगी जेट; रियाला हवं आहे हे सर्व..

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात रोज नवनवीन खुलासे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे व त्याविषयी तक्रारही नोंदवली आहे. अशातच रिया चक्रवर्तीचा एक जुना विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तिला खरेदी करायच्या आहेत.  या व्हिडिओमध्ये रिया […]

कोरोना देश

भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच महंत नृत्यगोपाल दास हे देखील उपस्थित होते. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत […]

मनोरंजन महिला विशेष

Happy Birthday Shridevi – पद्मश्रीने सन्मानित अभिनेत्री श्रीदेवीशी संबंधित काही खास गोष्टी

सौंदर्याला अभिनय आणि नृत्यविष्काराची जोड देत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज वाढदिवस . देशभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. एक सामान्य मुलगी ते बॉलिवुडची सुपरस्टार अभिनेत्री असा त्यांचा प्रवास आहे. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव अय्यापान आहे जे पेशाने वकील आहेत. […]

महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांच्यासह कुटुंबातील तिघांचा करोनामुळे मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन झाले आहे. सोलापूर येथे खासगी रुग्णालयात ते करोनाचा उपचार घेत होते. दरम्यान, यामध्ये त्यांचे दुःखद निधन झाले आहे. पाटील यांच्या कुटुंबातील त्यांचे चुलते, धाकटे बंधु आणि आता राजू बापू यांचा मृत्यू करोनामुळे झाला. शरद पवार यांच्या शिफारशीवरून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी […]

महाराष्ट्र राजकारण

पार्थ लंबी रेस का घोडा है, नितेश राणे यांचं ट्विट

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा”. […]

महाराष्ट्र

सुशांत जिवंतपणी जेवढा लोकप्रिय नव्हता तेवढा मरणोत्तर झाला, माजी खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. राज नवनवीन वक्तव्य केली जात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “सुशांत जिंवत असताना जेवढा प्रकाशझोतात नव्हता तेवढा तो मरणोत्तर आला आहे,” असं ते म्हणाले. “सुशांत जिंवत असताना जेवढा लोकप्रिय नव्हता तेवढा तो मरणोत्तर झाला आहे. […]

महाराष्ट्र राजकारण

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी शरद पवार यांची प्रतिक्रिया

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही. महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस […]