‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन उत्पादित करणारे प्लांट आहेत, त्यात उत्पादन होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा अन्य उद्योगांना होत होता, तर केवळ २० टक्केच ऑक्सिजनचा पुरवठा मेडिकलसाठी केला जात होता. आता त्यात बदल करून एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करावा, असे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन
दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं आज निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्यची म्युझिक अरेंजर, निर्माता अशी संगीतविश्वात ओळख होती. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी पहाटे आदित्यने अखेरचा श्वास […]
कोविड १९ (कोरोना) लस चाचणीसाठी सिरमची उमेदवार भर्ती रोखली
नवी दिल्ली : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. पुढच्या आदेशापर्यंत औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय. व्ही जी सोमानी यांच्या आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात […]
ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर
मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]
सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं- खासदार उदयनराजे भोसले
‘मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हते. त्याचा परिणाम आज मराठा समाजाला भोगावा लागत आहे. आता सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उदयनराजे यांनीही फेसबुक पोस्टच्या […]
Redmi Note 9 Pro चा आज फ्लॅश सेल,जाणून घ्या फीचर्स
Redmi Note 9 Pro चा आज अॅमेझॉन इंडिया आणि Mi.com वर फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ […]
रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली एनसीबीने अटक केलेली आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. रियाने त्यानंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. […]
मर्यादा ओलांडू नका, तैवानचा चीनला स्पष्ट शब्दांत इशारा
तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून कमालीचा तणाव आहे. आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत. तैवानचे […]
तुकाराम मुंढे नागपूरकरांना म्हणाले, Thank you Nagpur, अलविदा..!
नागपुरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून आज ते मुंबईसाठी रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर त्यांच्या निवासस्थानी जमले होते. नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचे धन्यवाद मानत […]
तुकाराम मुंढेंनी कार्यभार स्वीकारायच्या आधीच त्यांची नियुक्ती रद्द
काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आता पदाची शोधाशोध सुरू आहे. राज्य सरकारने अवघ्या 15 दिवसात त्यांच्या बदलीचे आदेश मागे घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांची 26 ऑगस्टला मुंबईत बदली करण्यात आली होती, तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. […]










