ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. “गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ABCD या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अटक
कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अभिनेता किशोर शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ड्रग्स सोबत बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सिटी क्राईम ब्रांचने प्रसिद्ध नर्तक आणि ABCD या चित्रपटातील अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोरने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता. बॉलिवुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा […]
भारतीय नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाच युद्धनौकेवर तैनात होणार दोन महिला अधिकारी
भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंह या दोघीही आयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलेट म्हणून ऑन बोर्ड काम करतील. युद्धनौकेवर तैनात होणाऱ्या भारतीय नौसेनेच्या या पहिल्या महिला अधिकारी ठरतील. यापूर्वी केवळ समुद्रकिनाऱ्यांवरुन उडून पुन्हा परतणाऱ्या हेलिकॉप्टरच्या […]
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा, कोरोना चाचण्या वाढवा अन्यथा..
महाराष्ट्रात वारंवार सांगूनही कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले जात नाही. यामुळे कोरोना रुग्ण आणि मृत्यू दोन्ही वाढतील हे लक्षात घ्या, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. जास्तीतजास्त चाचण्या वेळेत केल्यास रुग्णांचा लवकर शोध लागू शकतो तसेच त्याची जीवही वाचू शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अपर सचिव आरती आहुजा यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्र […]
मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी; सोलापूर जिल्ह्या बंद
सोलापूर : मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान आंदोलनाची पहिली ठिणगी सोलापुरात पडली आहे, सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल […]
भिवंडीत पटेल कंपाउंड परिसरात तीन मजली इमारत कोसळली, ८ ठार
भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी […]
राज्यसभेत प्रचंड गदारोळादरम्यानच कृषी विधेयक झाले मंजूर
नवी दिल्ली: कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक ही तीन विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ही विधेयकं राज्यसभेत मांडण्यात आली ज्यावरुन मोठा गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे या गदारोळातच राज्यसभेत हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले आहे. दरम्यान, सभागृहातील गदारोळानंतर राज्यसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं […]
सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण
मुंबईः सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल आज एम्सच्या डॉक्टरांच्या टीमसमोर सादर होण्याची शक्यता आहे. पण हा अहवाल सादर होण्याआधीच सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. व्हिसेरा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली गेली नाही. मुंबईतील फॉरेंसिकच्या प्रयोगशाळेने सुशांत प्रकरणात नमुने मिळवण्यात तसेच त्यांचे अहवाल करण्यात जास्त वेळ खर्ची पडल्याचे मान्य केले तसेच व्हिसेराचा पुरेसा […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची फेरपडताळणी?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला तशी विनंती केली आहे, या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन कर मंडळाने सीबीडीटीला फेरपडणताळणीची विनंती केली आहे. त्याबाबत स्मरणपत्रही पाठवण्यात आलं आहे. ठाकरे पिता-पुत्र व […]
कृषि विधेयक : शेतकरी जास्त पीडित व कॉर्पोरेटस सर्वात मोठे लाभार्थी – जयराम रमेश
नवी दिल्ली : दोन कृषिविषयक विधेयके जे न्यूनतम समर्थन मूल्य (MSP) आणि सार्वजनिक खरेदी प्रणाली संपुष्टात आणणार आहेत, आज राज्यसभेत सादर होणार आहेत. सर्वात जास्त पीडित : शेतकरी… सर्वात मोठे लाभार्थी : कॉर्पोरेटस’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय. या दोन विधेयकांमुळेत देशातील खाद्य सुरक्षेचे दोन स्तंभ उद्ध्वस्त होणार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. Two agri-marketing […]










