PM narendra modi
राजकारण शेती

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर पीएमओची टीका

आज केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांचा हक्क देत असतानाही हे लोक निषेधावर उतरले आहेत. या लोकांना अशी इच्छा आहे की देशातील शेतकरी आपले उत्पादन खुल्या बाजारात विकू शकणार नाहीत.  हे लोक आता शेतकरी ज्या वस्तू व उपकरणांना पूजा करतात त्या वस्तू पेटवून शेतकर्‍यांचा अपमान करीत आहेत.. असे ट्विट प्रंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आज जब केंद्र […]

Aditya Thackeray
इतर

ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार – आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं कि ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये […]

Samsung Galaxy Tab A7
गॅझेट्स

Samsung Galaxy Tab A7 : सॅमसंग टॅब दोन व्हेरिअंटमध्ये लाँच ( LTE & WI-FI)

Samsung कंपनीने Galaxy Tab A7 लाँच केला हे दोन व्हेरिअंटमध्ये LTE आणि Wi-Fi आणला आहे. सॅमसंग Galaxy Tab A7 च्या Wi-Fi , तीन रंगांच्या पर्यायात (डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्वर) उपलब्ध असेल. व्हेरिअंटची किंमत भारतात 17 हजार 999 रुपये आहे, तर LTE व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही निवडक रिटेल स्टोअर्समध्ये […]

Uday Samant
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत गेल्या दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत. उदय सामंत यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली कि प्रकृती चांगली  असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “गेले दहा दिवस […]

Lyricist Abhilash
मनोरंजन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन

गीतकार अभिलाष यांचे मुंबईत निधन झाले आहे. 74 वर्षीय अभिलाष यांनी रविवारी गोरेगाव येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिलाष गेल्या काही महिन्यांपासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. आज पहाटे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गीतकार अभिलाष यांनी १९८५ मध्ये ‘अंकुश’ या चित्रपटासाठी लिहीलेली प्रार्थना ‘इतनी शक्ती हमे देना […]

uddhav-thakrey
महाराष्ट्र

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तयार केली मार्गदर्शक तत्वे

राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून […]

Rahul Tewatia
क्रीडा

IPL 2020 : एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार; राहुल तेवतियाची कामगिरी

IPL २०२० : राजस्थानला विजयासाठी २२४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतू अष्टपैलू राहुल तेवतिया संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. शेल्डन कोट्रेलच्या १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार खेचले आणि सामन्याचं चित्रच पालटलून टाकलं. […]

whole day news top 5 news
देश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, 27 सप्टेंबर 2020

आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात… कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर – घटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. अदर पूनावाला यांनी […]

ram nath kovind
देश शेती

कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर; विधेयकांचे कायद्यात रुपांतर

दिल्ली : शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू ही तीनही विधेयकं गेल्या आठवड्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली. मात्र, ही विधेयक शेतकऱ्यांच्या हिताच्याविरोधात असल्याचा दावा विविध शेतकऱी संघटनांनी केला आहे. संघटनांची या विधेयकांविरोधात आंदोलनं सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या […]

Poonawala & Modi
कोरोना देश राजकारण

अदर पूनावाला यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक..

भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. जगाला लस पुरवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला आमचा पाठिंबा आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण […]