Aditya Thackeray

ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा विचार – आदित्य ठाकरे

इतर

मुंबई : मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने सोमवारीच दोन लाखांचा टप्पा ओलांडला. ही बातमी ताजी असतानाच मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं कि ऑक्टोबर मध्यापर्यंत खासगी ऑफिसेस आणि मुंबईतली लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

खासगी कार्यालयं २४ तास सुरु रहावीत असा आमचा विचार आहे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळांमध्ये येण्याची मुभा राहिल. लोकलही पूर्ण क्षमतेने ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरु करण्याचा विचार आहे. जर खासगी ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले तर लोकल्समध्ये होणारी गर्दी कमी होऊ शकते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देणं, वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देणं ही जशी सरकारची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आपण घराबाहेर पडताना आपली काळजी घेणे आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ न देणं ही नागरिकांची जबाबदारी आहे. कारण आपण आपली काळजी घेतली नाही तर आपण फक्त आपला धोका वाढवत नाही तर कुटुंबाचाही धोका वाढवतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. बाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर सोशल डिस्टन्सिंगही पाळलं गेलंच पाहिजे असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत