Former Union Minister Harsimrat Kaur Badal
देश

शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही झालोय त्यांचा आवाज – माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल

माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली, हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलातर्फे होत असलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत, कृषि कायद्यांना विरोध दर्शवतच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर शिरोमणी अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडलं. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज […]

Justice is done on Krishnakunj
महाराष्ट्र मुंबई

कृष्णकुंजवर न्याय मिळतोच, मनसे व्यक्त केला आनंद

मुंबई : डबेवाल्यांना परवानगी देण्याच्या या निर्णयाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वागत केलं आहे. २४ सप्टेंबर रोजी मुंबईच्या डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं मनसे प्रमुख राज यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या डबेवाल्यांकडून रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु रेल्वे प्रशासानानं त्यांची मागणी मान्य केली नव्हती. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान […]

Unlock 5.0 guidelines
देश महाराष्ट्र

Unlock 5.0 guidelines : जाणून घ्या आजपासून काय सुरु? काय राहणार बंद?

१ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून आणखी काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यात काय सुरु झालं आहे आणि काय बंद राहणार आहे.  ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने […]

Parth Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मराठा आरक्षणावरुन पार्थ पवार आक्रमक; सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही – पार्थ पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात जात मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही सरकारकडे केली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार यांनी ट्विट […]

Babri Masjid
देश

बाबरी मस्जिद प्रकरणी आज अंतिम निकाल.. जाणून घ्या घटनाक्रम

अयोध्या : सीबीआय कोर्टात 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला लखनऊच्या सीबीआय कोर्टात अंतिम टप्प्यात आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष […]

Hathras rape
देश

हाथरस बलात्कार : पीडितेवर पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा कुटुंबीयांचा दावा

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. १९ वर्षीय दलित तरुणीची १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या भावाने […]

मनोरंजन

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ च्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

मनोरंजन : चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak )म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट ‘चंद्रमुखी’ येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोर जातोय, अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. ब-याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील […]

Poco M2 smartphone
तंत्रज्ञान

Poco M2 स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आज ओपन सेलमध्ये उपलब्ध

पोको चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘पोको इंडिया’ने या महिन्याच्या सुरूवातीला Poco M2 स्मार्टफोन भारतात लाँच केला. आता हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघण्याची गरज नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज (३० सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपासून हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Poco M2 स्पेसिफिकेशन्स  […]

Shri Jagannath temple in Puri
देश

पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील ४०४ सेवेकरी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

बाराव्या शतकातील पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरातील ३५१ सेवेकरी व ५३ कर्मचारी यांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिराचे प्रशासक अजय जेना यांनी दिली. ते म्हणाले की, जगन्नाथ मंदिरातील पूजाअर्चा चालू असून सध्या कुणीही सेवेकरी उपस्थित नाहीत. जगन्नाथ मंदिर मार्चपासून करोनामुळे बंद ठेवण्यात आले होते. करोना झालेले सर्व जण घरी विलगीकरणात असून पूजाविधीची […]

Corona Vaccine
कोरोना

पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी

पुणे : ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली. सिरम इन्स्टि्टयूट या लशीची निर्मिती करणार आहे. स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. झायडस कॅडिला तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ […]